कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोड्या वाढल्या !

पोलीस निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याचा परिणाम !

प्रतिकात्मक चित्र

कल्याण – कल्याण-डोंबिवली हद्दीतील पोलीस लोकसभा निवडणूक कामावर व्यस्त असल्याने रात्रीच्या वेळेत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यात सलग ४ दिवस कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे घरफोड्या करण्यात आल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.