आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका ! – नवनीत राणा, भाजप

मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.

पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.च्या गाड्या प्रवासी मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास !

पी.एम्.पी.एम्.एल्.कडे टप्प्याटप्प्याने ६५० नवीन इ-बस येणार होत्या. या सर्व गाड्या वर्ष २०२१ पर्यंत येणार होत्या. आतापर्यंत ४७३ इ-बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अजूनही १७७ इ-बस प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.

भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्तीकरण नसल्याचे शिक्षणतज्ञांचे निरीक्षण !

‘सुकाणू समिती’चे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरांविषयी महाविद्यालयांमध्ये गोंधळ दिसत आहे. परंपरांचे उदात्तीकरण नव्हे, तर त्यातील ज्ञान, विज्ञान पुढे येणे आवश्यक आहे. ‘आय.के.एस्.’विषयी आम्ही लवकरच सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे सांगू.

मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात आहेत !

मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासहच ठाकरेंनीही एक फतवा काढला आहे.

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या काळात नेमके काय केले ? तुम्हाला काय वाटते ?, असे प्रश्न पुणे येथील वार्तालापात पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

भारतातील संतांचे महान कार्य !

भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले