नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के !

गेल्या २ महिन्यांत ६ भूकंपांची नोंद

नागपूर – येथे कामठीनजीकच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नागपूरमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या काळातही ६ भूकंपांची नोंद करण्यात आली होती. हे धक्के सौम्य असले, तरीसुद्धा त्यांमागील नेमकी कारणे आता शोधली जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.