आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका ! – नवनीत राणा, भाजप

नवनीत राणा, भाजप

अमरावती – मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.

नवनीत राणा यांनी नुकताच भाग्यनगरमध्ये लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. या वेळी त्यांनी वर्ष २०१३ च्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्या ‘पोलिसांना १५ मिनिटे हटवले, तर आम्ही काय करू शकतो, दाखवून देऊ’ या विधानाच्या संदर्भाने ‘‘आम्हाला १५ मिनिटे नाही, तर १५ सेकंद लागतील’’, असे विधान केले होते. त्यावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘‘मी तुम्हाला १५ सेकंद नाही, तर १ घंटा देतो, तुम्ही काय करू शकता सांगा ?’’ त्यावर राणा यांनी त्यांना परत सुनावले आहे.

अमरावतीत आपला पराभव होणार, हे नवनीत राणा यांना माहिती असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या अशा प्रकारे विधाने करत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया ए.आय.एम्.आय.एम्.चे नेते वारिस पठाण यांनी दिली.