मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात आहेत !

पुण्यातील प्रचारसभेत राज ठाकरे यांचा दावा !

पुणे – मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासहच ठाकरेंनीही एक फतवा काढला आहे. पुण्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा पार पडली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांवर निशाणा साधला. मशिदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान होण्यासाठी फतवा काढल्याचा सर्वांत मोठा दावा राज ठाकरेंनी केला आहे, तसेच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीपातीचे राजकारण चालू झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मुसलमान समाजालाही समजते की, काय राजकारण चालले आहे ? कोण आपल्याला वापरून घेत आहे ते. मशिदीमधून मौलवी फतवे काढत असतील, तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा. उद्या मुसलमानांच्या हातात काही गोष्टी चुकून गेल्या, तर या रस्त्यावर फिरणे कठीण करतील.