पुणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित शोभायात्रा उत्साहात पार पडली !
पुणे येथे नागरिकांनी ठिकठिकाणी नववर्षाचे शोभायात्रेद्वारे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय अनेक संघटना, संस्था यांनी सार्वजनिक गुढीही उभारली. याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनेही ९ एप्रिलला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.