मालेगाव (नाशिक) येथे नमाजानंतरच्या सभेत धर्मांधाने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावला !

धर्मांधांची मानसिकता आणि धैर्य जाणा !

पॅलेस्टाईनचा ध्वज

नाशिक – मालेगाव येथे नमाजानंतर मौलाना इस्माईल शेख यांचे मार्गदर्शन चालू असतांना एक धर्मांध तरुण पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन त्या सभेतून फिरत होता. या वेळी मौलानांनी भाषणात तेथील लोकांवर किती अत्याचार झाले ? याविषयी भाष्य केले.

या तरुणाला पाहिल्यावर मात्र मौलानांनी सारवासारव करत म्हणाले, ‘‘मी जरी तेथील लोकांच्या अत्याचाराविषयी बोललो तरी याचा आणि माझा काही संबंध नाही.’’  या वेळी प्रचंड मोठ्या संख्येने मुसलमान समुदाय उपस्थित होता.

संपादकीय भूमिका :

जे भारतात राहून आतंकवादाचा पुरस्कार करतात आणि आतंकवादाला विरोध करणारे इस्रायलसारखे देश ज्यांना शत्रू वाटतात, त्यांना त्यांच्या आवडत्या देशात जायला अवश्य मुभा आहे. मात्र भारतात राहून अशा प्रकारचे देशविरोधी वर्तन करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. ही गोष्ट त्यांना चांगली लक्षात येईल, अशा प्रकारे त्यांना दंडित करायला हवे !