पहिल्या तक्रारीचा अहवाल प्राप्त, तरी कारवाई नाही ?
पुणे – बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणार्या २ विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’ (नवीन विद्यार्थ्यांचा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून शारीरिक किंवा मानसिक स्तरावर केलेला छळ) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यामध्ये या घटना घडल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असून ती क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. दुसरी विद्यार्थिनी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींनी ‘रॅगिंग’ची तक्रार प्रशासनाकडे केली होती. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पहिल्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारींवर ‘रॅगिंग प्रतिबंधक समिती’ने चौकशी केली. त्यात तक्रारदार विद्यार्थिनी, तिच्या वर्गातील विद्यार्थी, दुसर्या वर्षातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आता दुसर्या विद्यार्थिनींच्या तक्रारींवर सध्या चौकशी चालू आहे. (रॅगिंगसारख्या प्रकारावर कायमस्वरूपी समिती असणे आवश्यक असतांना तक्रार झाल्यानंतर समिती नेमणे हा प्रशासनाचा गलथानपणाच आहे ! – संपादक) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, ‘‘रॅगिंगविषयी पदव्युत्तरच्या एका विद्यार्थिनीने गेल्या महिन्यात तक्रार केली होती. त्याचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. दुसर्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीचा वाद विभागांतर्गत आहे. त्याचेही अन्वेषण चालू आहे.’’
संपादकीय भूमिका :
|