बीजिंगला मागे टाकत मुंबई अब्जाधिशांची राजधानी !

अब्जाधिशांची राजधानी झालेली मुंबई गुन्हेगारीमुळे असुरक्षितही आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे वडिलांचा राग आल्याने मुलीने घर सोडले !; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला अटक !…

अल्पवयीन मुलीला ‘भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी शिकवणी वर्ग किंवा संगणकाचा वर्ग लाव’, असा वडिलांनी सल्ला दिला. याचा राग आल्याने मुलगी घर सोडून गेली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

Delhi GHARWAPSI : देहलीत एका मुसलमान मुलीची हिंदु धर्मात ‘घरवापसी’!

देशाची राजधानी देहलीत नुकतीच एका मुसलमान मुलीने हिंदु धर्मात ‘घरवापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारलेल्या या मुलीचे नाव उज्मा असून ती आता मीरा म्हणून ओळखली जाणार आहे.

पुणे येथे ‘मॅफेड्रोन’ची विक्री करणार्‍या टोळीतील शोएब शेख याला अटक !

पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी पकडली आहे. त्यांच्याकडून ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त केले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेकडे २ सहस्र १३९ कोटी रुपये मिळकतकर जमा !

चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतीच्या संदर्भात कोणतीही ‘अभय योजना’ नाही. वर्ष २०१९ नंतरच्या सर्व मिळकतींना ३० टक्के सवलत दिलेली आहे. असे असतांनाही यंदा अधिक मिळकतकर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

पुणे शहरात धूलिवंदनाच्या दिवशी १४२ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नोंद !

सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !

लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !

Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

मागील लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !

मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८५.९३ टक्के उमेदवारांना त्यांची ठेवही राखता आली नाही.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी पोलिसांच्या कह्यात !

एकात्री विनोदी कार्यक्रमातून हिंदु धर्मावर अवमानास्पद टिप्पण्या करणारा मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर कह्यात घेतले होते.