यापुढे पू. भिडेगुरुजी यांच्यावर कुणी आक्रमण केल्यास धारकरी ‘जशास तसे’ उत्तर देतील ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २९ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपवून धुळे येथे जात असतांना काही विचारशून्य, पळपुट्या जमावाने पू. भिडेगुरुजींच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच गाडीला आडवे येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

अकोला येथे ४८ ट्रक गहू गायब प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह ७ आरोपींना शिक्षा !

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेले ४८ ट्रक धान्य वर्ष  १९९९ मध्ये गायब झाले होते. घडलेल्या या प्रकरणाचा २४ वर्षा नतर निकाल लागला असून दोषी आढळलेल्या तत्कालीन निवासी ७ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणारा सातारा येथून कह्यात !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍या मुख्य आरोपीला सातारा येथील सदर बझार येथून २ मार्च या दिवशी अटक केली. किंचक नवले असे या आरोपीचे नाव असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हैदर शेखने अमली पदार्थ विक्रीतील पैसे ‘हवाला’द्वारे देहलीला पाठवले ! – पुणे पोलीस

‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा ३४० किलो कच्चा माल गुन्हे शाखेच्या पथकाने २ मार्च या दिवशी विश्रांतवाडी येथून जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. हा माल एका टेंपोमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.

Ameer Jameel-ur-Rehman Dies:पाकमध्ये काश्मिरी आतंकवाद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.

जन्मदात्या आई-वडिलांना वार्‍यावर सोडल्याच्या संदर्भात देशात ७ लाख खटले प्रलंबित !

आजच्या पिढीला धर्मशिक्षण नसल्यामुळेच मुळात ती तिच्या आई-वडिलांवर अन्याय-अत्याचार करत आहे. श्रावणबाळ आणि पुंडलिक यांसारख्याच्या भारतासाठी हे लांच्छनास्पदच !

India Intercepted China Ship:चीनकडून पाकला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारे यंत्र घेऊन जाणारी नौका भारताने अडवली !

पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !

चुकीची प्रश्‍नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांना साडे चार घंटे थांबावे लागले !

४ दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रश्‍न पुन्हा नवीन प्रश्‍नपत्रिकेत कसे काय येतात ? शैक्षणिक क्षेत्रात असा हलगर्जीपणा करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !

अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Pakistan Ban Facebook YouTube:पाकच्या संसदेत फेसबुक, यू ट्यूब आदींवर बंदी घालण्याचा प्रस्ताव !

‘सामाजिक माध्यमांच्या नकारात्मक प्रभावापासून तरुण पिढीचे रक्षण करण्यासाठी त्यावर बंदी घालण्यात यावी,’ असे या प्रस्तावात म्हटले आहे.