India Intercepted China Ship:चीनकडून पाकला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारे यंत्र घेऊन जाणारी नौका भारताने अडवली !

उरण – ‘आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमा’त वापरण्यात येणार्‍या ‘कम्पुटर न्युमरिकल कंट्रोल’चे (‘सी.एन्.सी.’चे) साहित्य भारताच्या न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी चीनमार्गे पाकिस्तानला जाणार्‍या नौकेतून जप्त केले.

सी.एन्.सी. म्हणजे ‘संगणक नियंत्रण यंत्र’ हे स्वयंचलित असून तिथे मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. सुरक्षायंत्रणांनी ‘संरक्षण संशोधन आणि संस्थे’च्या (‘डी.आर्.डी.ओ.’च्या) साहाय्याने जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली असता वरील गोष्ट उघड झाली. पाकिस्तानच्या आण्विक उपक्रमांमध्ये क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि निर्मितीमध्ये या सामग्रीचा वापर केला जातो.

न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना याविषयीची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणांकडून मिळाली होती. त्या आधारावर संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त कारवाई करत कराचीकडे जाणार्‍या एक संशयित व्यापारी नौकेवर कारवाई करून ती रोखली.

सौजन्य : ht

१.२२ सहस्र १८० किलोग्रॅम वजनाची ही सामग्री चीनमधील ‘तैयुआन मायिनग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट’ आस्थापनाने पाकिस्तानमधील ‘कॉसमॉस इंजिनीअर’ या आस्थापानाच्या नावाने पाठवण्यात येत होती.

२. क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे ‘सी.एन्.सी.’ यंत्र इटालियन आस्थापनाकडून सिद्ध केले जाते. हे यंत्र संगणकाद्वारे नियंत्रित केले जाते. या यंत्राद्वारे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते.

३. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात वापरल्या जाणार्‍या या ‘ऑटोक्लेव्ह’च्या जप्तीमुळे मात्र पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे (एम्.टी.सी.आर्.चे) उल्लंघन करत असल्याचे लक्षात आले आहे.

४. सी.एन्.सी. यंत्राचा वापर याआधी उत्तर कोरियाने केला होता. आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आणि लष्करी अणुप्रयोगासह वस्तूंचा प्रसार रोखणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये भारत सक्रीय आहे.

५. नौकेरील सामग्री ‘शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड’मधून भरण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !