यापुढे पू. भिडेगुरुजी यांच्यावर कुणी आक्रमण केल्यास धारकरी ‘जशास तसे’ उत्तर देतील ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर निवेदन देऊन झाल्यावर एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २९ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपवून धुळे येथे जात असतांना काही विचारशून्य, पळपुट्या जमावाने पू. भिडेगुरुजींच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच गाडीला आडवे येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तरी यापुढील काळात कोणत्याही संघटनेने अथवा समाजकंटकाने अशा प्रकारचा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी त्याच भाषेत उत्तर देतील आणि होणार्‍या परिणामांना सर्वस्वी समाजकंटकच उत्तरदायी रहातील, असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित देण्यात आले.

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री अर्जुन चौगुले, अभिनंदन सोळांकुरे, आशिष पाटील, अवधूत चौगुले, दशरथ शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, तसेच धारकरी, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.