Ameer Jameel-ur-Rehman Dies:पाकमध्ये काश्मिरी आतंकवाद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

नवी देहली – पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे एक पसार काश्मिरी आतंकवादी अमीर जमील-उर-रहमान याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. रहमान जिहादी संघटना युनायटेड जिहाद कौन्सिलचा सरचिटणीस आणि तहरीक-उल-मुजाहिदीन संघटनेचा आतंकवादी होता. त्याचा मृत्यू २ मार्च या दिवशी पाकच्या अबोटाबाद येथे झाला.

काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते. जम्मू-काश्मीरमधील अनेक आतंकवादी आक्रमणांमध्ये त्याचा हात होता. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.मध्येही काम करत होता. तसेच तो काश्मिरी तरुणांना जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रशिक्षण देत होता. तसेच समन्वयाचाही काम करत होता.