|
पुणे – पुणे परिमंडळातील ‘महावितरण’च्या ५ लाख ८७ सहस्र २८६ अशा घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे १२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २० दिवसांमध्ये १८ सहस्र ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ‘थकीत वीजदेयकांचा भरणा त्वरित करावा’, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. (केवळ वीज खंडित न करता, वीजदेयक न भरणार्या संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)
पुणे शहरातील २ लाख ५४ सहस्र ९११ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १७ सहस्र ६२५ ग्राहकांकडे ३२ कोटी ३२ लाख रुपये, वाणिज्यिक ३४ सहस्र ८६९ ग्राहकांकडे ११ कोटी ६४ लाख रुपये आणि औद्योगिक २ सहस्र ४१७ ग्राहकांकडे २ कोटी ६७ सहस्र रुपयांची थकबाकी आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी कशी काय रहाते ? याला उत्तरदायी असणार्यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! शासकीय सुटीच्या दिवशी वीजदेयक भरणा केंद्रे चालू करणे, म्हणजे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असेच म्हणावे लागेल ! |