महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

पाटलीपुत्र येथील ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पट अधिक असते. या तत्त्वाचा लाभ अधिकाधिक भाविकांना व्हावा’, यादृष्टीने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, सैदपूर, गाझीपूर, दीनदयाल उपाध्याय, भदोही, प्रयागराज, सुलतानपूर आणि अयोध्या; बिहारमधील पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, सोनपूर अन् गया येथे; झारखंडमधील धनबाद, कतरास, जमशेदपूर आणि देवघर, तर बंगालमधील हावडा अन् कोलकाता येथील शिवमंदिरांमध्ये सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ, धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात घेतला.