उरळी कांचन (पुणे) – भूमीच्या सातबारा उतार्यावरील कमी केलेले नाव पुन्हा सातबारा उतार्यावर लावण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकार्यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांनी ७ सहस्र रुपये स्वीकारण्याचे संमत केले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेऊर येथील मंडल अधिकारी महिलेसह २ संगणक चालकांना कह्यात घेतले. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचून आरोपींना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्ट अधिकार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |