भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशाच्या येथील ‘वल्लभ भवन’ नावाच्या मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ९ मार्चच्या सकाळी भीषण आग लागली. आग विझवतांना येथे अग्नीशमनदलाचे सैनिक अडकले. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. आगीवर अनेक घंटे नियंत्रण मिळवण्यात यश न मिळाल्याने भारतीय सैन्याला बोलावण्यात आले. (मध्यप्रदेश राज्याकडे समर्थ अग्नीशमनदल नसणे हे लज्जास्पद ! संपतकाळात ही स्थिती आहे, तर आपत्काळात जनतेचे रक्षण कसे होणार ? – संपादक) या आगीमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून राख झाली. या आगीत जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.