तुर्भे येथे अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तन !
नवी मुंबई – सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणासह संस्कारांचीही नितांत आवश्यकता असून पालकांनी संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नारायणगाव येथील हिंदु धर्म प्रचारक ह.भ.प. भागवताचार्य रामायणाचार्य विश्वनाथ महाराज रिठे यांनी तुर्भे येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनात केले.
‘आजच्या तरुणांना धर्माविषयी प्रेमच राहिलेले नाही, ही शोकांतिका आहे. यासाठी पालकांनी मुलांना कीर्तनाला जाऊन तेथे टाळ देणे, कीर्तन संपल्यावर तेथील बैठक व्यवस्था उचलून ठेवणे इत्यादी कृती करण्यास सांगू शकतो. त्यातून त्यांना हिंदु संस्कृतीची महानता लक्षात येऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ लागतील’, असेही ते म्हणाले.