सेलू (जिल्हा वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अपहार केल्याप्रकरणी प्राचार्य निलंबित ! – मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आदेश

सेलू (जिल्हा वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात संस्थेच्या प्राचार्यांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यून न करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ कारागृहात डांबावे !

शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या ‘प्रणव : माय फादर’ या पुस्तकामागे भाजप !  – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘प्रणव : माय फादर’ या पुस्तकावरून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाला आहे.

नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी ! – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधील कालावधीमध्ये झालेल्या घडामोडींशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते विधानसभेचे सदस्य आहेत.

अल्पवयीन मुलाची हत्या करणारे दोघे अटकेत !

तरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि क्रूरता रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता !

नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटातील सदस्यांसमवेत बसले होते.

मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता !

बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता.

सौंदत्ती यात्रेसाठी ‘एस्.टी.’चा ‘खोळंबा आकार’ नाममात्र २० रुपये आकारण्यात येणार ! – राजेश क्षीरसागर

कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून २०० हून अधिक एस्.टी. गाड्यांतून भाविक जातात. या यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने ‘खोळंबा आकार’ प्रतिघंटा ९८ रुपयांवरून नाममात्र २० रुपये करण्यात आला आहे.

वागातोर  येथे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !

नागरिकांना तापदायक ठरणार्‍या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !

गोव्यात गेल्या ४ वर्षांत व्यावसायिकांनी १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ बुडवला

राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.