ममदापूर (अहिल्यानगर) येथे धर्मांध गोतस्करांकडून गोरक्षकांवर गोळीबार !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चुकीची वीजदेयके टाळण्यासाठी राज्यात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील ! – देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री

चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी लवकरच राज्यात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

अवेळी पडलेल्या पावसाविषयी चर्चेस अनुमती न मिळाल्याने विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

अवकाळी पावसामुळे झालेली शेतीची हानी आणि सरकारकडून दिली जाणारी हानीभरपाई याविषयी चर्चेची मागणी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत विरोधकांनी केली.

सांगली सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधांसाठी १० कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान देऊ ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

सांगली सामान्य (सिव्हिल) रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. ही दोन्ही यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले होते; मात्र या दोन्ही यंत्रांसाठी एकूण १० कोटी ३० लाख रुपयांचा व्यय आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली, सराटी येथे बेमुदत उपोषण आंदोलन केले होते. ‘या वेळी आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर नोंद झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या’, अशी विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केली होती.

Savarkar Hatred Congress : (म्हणे) ‘माझ्या हातात असते, तर मी विधानसभेतून सावरकरांचे छायाचित्रे हटवले असते !’ – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कितीही द्वेष केला, तरी त्यांचे महत्त्व जराही अल्प होणार नाही.

पालघर जिल्हा परिषदेचा शासनाकडे गेलेला ४० कोटी रुपयांचा निधी परत मिळवला जाईल ! – गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

पालघर जिल्ह्यातील पाड्यांमधील रस्ते, वीज, पाणी, तसेच कुपोषणासाठी दिलेला आणि २ वर्षांत शासनाकडे परत गेलेला ४० कोटी रुपयांचा अखर्चित निधी परत मिळवून तो विकासकामांसाठी वापरला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Delhi Acid Attack : देहलीमध्ये बलात्कार पीडितेवर बलात्कार्‍याने आम्ल फेकून केली आत्महत्या !

आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.

BJP CM: भाजपकडून ३ राज्यांचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती !

हे निरीक्षक या राज्यांतील भाजपच्या आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडतील.  

Mizoram CM Oath : लालदुहोमा यांनी घेतली मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ !

मिझोराममधील ४० जागांवर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने २७ जागा जिंकल्या. त्यांच्या या पक्षाची ४ वर्षांपूर्वीच स्थापना झाली आहे.