सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यून न करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे एका मशिदीवरील भोंग्यांचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवल्यावरून पोलिसांनी मशिदीचा मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) अब्दुल्ला आणि मुतवल्ली (मशिदीचा व्यवस्थापक) बब्बू खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही मशीद पोलीस ठाण्याच्या शेजारीच आहे. पोलिसांनी या दोघांना अनेकदा आवाज न्यून करण्यास सांगितले; मात्र त्यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. सध्या राज्यात नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान पोलिसांकडून राबवण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ कारागृहात डांबावे !