Savarkar Hatred Congress : (म्हणे) ‘माझ्या हातात असते, तर मी विधानसभेतून सावरकरांचे छायाचित्रे हटवले असते !’ – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे

कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी द्वेषयुक्त विधान !

काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे

बेंगळुरू (कर्नाटक) – माझ्या हातात असते, तर मी विधानसभेतून सावरकरांचे छायाचित्र काढून टाकले असते. सावरकर अजिबात वीर नव्हते. यासाठी मी आव्हान द्यायलाही सिद्ध आहे, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

खरगे पुढे म्हणाले की, सावरकरांना ‘वीर’ ही पदवी कशी मिळाली ? हे भाजपाने सांगितले पाहिजे. ‘वीर’ ही पदवी सावरकरांना कुणी दिली ? ‘सावरकर इंग्रजांकडून निवृत्तीवेतन (पेन्शन) घेत नव्हते’, हे भाजप सांगेल का ? (मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ ही पदवी कुणी दिली ?, हे काँग्रेसने सांगितले पाहिजे ! – संपादक)

प्रियांक खरगे यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद म्हणाले की, सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान शून्य आहेे. भाजपची सत्ता आल्याने कर्नाटक विधानसभेत सावरकरांचे छायाचित्र लावण्यात आले. भाजपला इतिहास पालटायचा आहे. (भाजपला नाही, तर काँग्रेसला इतिहास पालटायचा असून तिने तो तिच्या सत्ताकाळात पालटलाही आहे. आता तो दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ! – संपादक)

सावरकरांचे छायाचित्र हटवण्याला आम्ही तीव्र विरोध करू ! – भाजप

प्रियांक खरगे यांच्याकडे चुकीची माहिती आहे; मात्र त्यांना वाटते की, ते सुशिक्षित लोकांपैकी आहेत. कर्नाटक विधानसभेतून जर वीर सावरकर यांचे छायाचित्र हटवण्याला आम्ही तीव्र विरोध करू, अशी चेतावणी भाजपचे आमदार भरत शेट्टी यांनी दिली आहे.

आमच्याकडे छायाचित्र काढण्याचा प्रस्ताव नाही ! – विधानसभा अध्यक्ष

कर्नाटकचे विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांनी सांगितले की, विधानसभेच्या सभागृहातून हिंदुत्वाचे विचारवंत विनायक सावरकर यांचे छायाचित्र काढण्याविषयी मला काही ठाऊक नाही. आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही.

संपादकीय भूमिका

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कितीही द्वेष केला, तरी त्यांचे महत्त्व जराही अल्प होणार नाही. उलट गेल्या ७५ वर्षांत काँग्रेस मात्र राजकीयदृष्ट्या संपण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे !