BJP CM: भाजपकडून ३ राज्यांचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती !

नवी देहली – नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांत भाजपला सत्ता मिळाली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे आता भाजपकडून मुख्यमंत्रीपद कुणाला देणार ?, याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून या राज्यांसाठी निरीक्षकांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांना छत्तीसगडसाठी भाजप निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा लाक्रा यांना नियुक्त करण्यात आले आहे, तर राजस्थानसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सरचिटणीस विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना नियुक्त केले आहे. हे निरीक्षक या राज्यांतील भाजपच्या आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडतील.

एकीकडे भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेळ लागत असतांना दुसरीकडे तेलंगाणा येथे काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी, तर मिझोराम मध्ये पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे नेते लालदुहोमा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.