
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – राहता तालुक्यातील ममदापूर येथील कुरेशी मोहल्ला परिसरात पोलिसांना घेऊन गोरक्षणासाठी गेलेले आप्पासाहेब नाईकवाडे, ईश्वर टिळेकर आणि साईराज बेंद्रे यांच्यावर गोतस्करांकडून आक्रमण करण्यात आले. यामध्ये आरोपींनी ६ डिसेंबर या दिवशी कोयते आणि तलवारीने यांनी आक्रमण केले, तसेच एकाने पिस्तुलाने गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आप्पासाहेब नाईकवाडे यांच्या तक्रारीवरून आरोपी नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, आरबाज कुरेशी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या वेळी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोणी पोलीस ठाण्यात हिंदू एकत्रित आले होते.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ? |
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !