हिंदुस्थानचा प्राण मराठा समाजात, शंभर टक्के आरक्षण मिळणार ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

कोणताही पक्ष आणि संप्रदाय असला, तरी आपण सर्व हिंदुस्थानचे म्हणून एक आहोत. महाराष्ट्रातील मराठा समाजात हिंदुस्थानचा प्राण आहे. आरक्षणाची समस्या १०० टक्के सुटणार आहे. हे आरक्षणाचे सूत्र लबाड राजकीय लोकांमुळे रेंगाळले आहे….

खड्डे बुजवले जात नसल्याने मालोडी टोलनाका फोडला !

भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी १ नोव्हेंबर या दिवशी मालोडी टोलनाका फोडला. ‘अंजुरफाटा ते चिंचोटी रस्त्यावर प्रचंड खड्डे असून ते खड्डे बुजवल्यानंतर टोल वसुली करावी’, असे सांगूनही टोल वसुली करण्यात येते. याच्या निषेधार्थ हा प्रकार करण्यात आला. 

महाबळेश्वर देवस्थानची १६६ एकर मिळकत माघारी देण्याचे वनविभागाला आदेश !

श्रीक्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची अनुमाने १६६ एकर मिळकत २ मासांत मोकळी करून माघारी देण्याचे आदेश महाबळेश्वर येथील दिवाणी न्यायालयाने वनविभागाला दिला आहे, तसेच थकबाकीची रक्कमही ६ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिल्याने वन विभागाला मोठा धक्का बसला आहे.

पूर्णा (जिल्हा परभणी) तहसील कार्यालय पेट्रोल टाकून पेटवले !

जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात १ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता ७ ते ८ अज्ञातांनी पेट्रोल टाकून पूर्णा तहसील कार्यालयाला आग लावली. हे करतांना ९ जणांनी कार्यालय बंद केले होते; परंतु कर्मचार्‍यांनी कार्यालयातील अग्नीरोधक आणि पाईप यांच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली.

महाराष्ट्रात ५५ हून अधिक ठिकाणी तक्रार देऊनही ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

या पुढील काळात सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

केजरीवाल कायद्यापेक्षा मोठे !

आपल्या देशात ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही’, असे घासून गुळगुळीत झालेले विधान कायदे मंडळातील ‘माननीय व्यक्तीं’कडून सर्रासपणे केले जाते.

मुंबईतील भयावह वाढती वाहनसंख्या !

‘हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे म्हणणारे कथित पर्यावरणवादी मुंबईसह देशात वाढत्या प्रदूषणावर काही उपाययोजना सांगणार का ?

शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा परिणाम !

देहलीमध्ये अपघातात घायाळ झालेल्या पियुष पाल या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. पियुष साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या कालावधीत चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पळवला.

इस्रायल आणि हमास यांच्यातील नूतन संघर्ष : दु:खद कोंडी कि पेच ?

वृृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून वाचकाला या सध्या चालू असलेल्या संघर्षामागील इतिहास, भूगोल अन् कारणे समजली आहेत. यांच्या व्यतिरिक्त काही अधिक सांगणे, म्हणजे त्यांच्यावर अधिक माहिती थोपवणे. धान्यापासून भुसा वेगळा करणे कठीण आहे.