सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार आहे. कोणताही पक्ष आणि संप्रदाय असला, तरी आपण सर्व हिंदुस्थानचे म्हणून एक आहोत. महाराष्ट्रातील मराठा समाजात हिंदुस्थानचा प्राण आहे. आरक्षणाची समस्या १०० टक्के सुटणार आहे. हे आरक्षणाचे सूत्र लबाड राजकीय लोकांमुळे रेंगाळले आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे कि नाही, हे चर्चेचे सूत्र असू शकत नाही. हे आरक्षण मिळणार का ? उद्या सूर्य उगवणार का ? त्याचे जे उत्तर आहे, तेच उत्तर आहे. हा प्रश्न चिघळताच कामा नये. जरांगे पाटील यांनी लक्षात घेतले पाहिजे की, उद्या सूर्याेदय होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जरांगे पाटील यांच्याकडेच रहाण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. यामध्ये राजकारणी लोक येता कामा नये.’’