अज्ञातांनी आग लावल्याची माहिती
परभणी – जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात १ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता ७ ते ८ अज्ञातांनी पेट्रोल टाकून पूर्णा तहसील कार्यालयाला आग लावली. हे करतांना ९ जणांनी कार्यालय बंद केले होते; परंतु कर्मचार्यांनी कार्यालयातील अग्नीरोधक आणि पाईप यांच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. कार्यालयामध्ये तहसीलदार माधवराव बोथीकर आणि कार्यालयीन अधिकारी अन् कर्मचारी उपस्थित होते. ‘या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे’, असे तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी सांगितले.