मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी मराठवाड्यात ४०० हून अधिक गावांमध्‍ये उपोषण चालू !

हिंगोली जिल्‍ह्यातील ५६३ गावांपैकी १०० हून अधिक गावांनी राजकीय नेत्‍यांना गावात प्रवेश बंदी केली.

शनिवारपासून श्री क्षेत्र कुर्ली-आप्‍पाचीवाडी (जिल्‍हा बेळगाव) येथील हालसिद्धनाथ देवाच्‍या यात्रेस प्रारंभ !

३० ऑक्‍टोबरला उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होईल. ३१ ऑक्‍टोबरला महानैवेद्य, रात्री ढोल जागर, नाथांची पालखी सबीनासह उत्‍सव मंदिराची प्रदक्षिणा आणि उत्तररात्री नाथांची दुसरी भाकणूक होईल.

घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडचा रत्नदुर्गावर समारोप

प्रत्येक हिंदुच्या मनात देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती जागृत व्हावी आणि हिंदूंचे संघटन अधिकाधिक बळकट व्हावे, यासाठी रत्नागिरीकरांनी श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद दिला.

९ देवी, ९ देवळे आणि ९ धार्मिक स्थळे असे ९ दिवस देवीच्या दर्शनाची राजापूरवासियांना मिळाली अनोखी संधी

या उपक्रमामुळे भाविकांना देवस्थानची महती आणि माहिती सांगण्यासह चित्रफितीच्या माध्यमातूनही हा अभिनव उपक्रम अनेक भाविकांपर्यत पोचवण्यात आला.

पावस (रत्नागिरी) येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विजयादशमीच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होण्याकरता सामूहिक शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने नशामुक्ती केंद्र चालू करावे ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, उपविभागीय अधिकार्‍यांनी शाळा, महाविद्यालये यांमध्ये राबवलेल्या प्रचार, प्रसार, जनजागृती कार्यक्रमांचा अहवाल सादर करावा.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना अभिवादन !

पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावतांना धारातिर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

कोल्हापूर बसस्थानकावर गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई ! 

कोल्हापूर – कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई चालू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘भारत डेअरी’चे श्री. प्रकाश मेहता, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अनील म्हेत्तर, कोल्हापूर आगाराचे बसस्थानक प्रमुखसुरेश शिंगाडे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन … Read more

राज्य पातळीवरच मराठा आरक्षणप्रश्‍नी तोडगा काढण्याची केंद्र सरकारची सूचना !

मराठा आरक्षणासाठी चालू असणार्‍या आंदोलनात हस्तक्षेप करण्यास किंवा कोणताही निर्णय घेण्यास केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे, असा दावा एका मराठी वृत्तपत्राने केला आहे.

ब्रिटनच्या संसदेत साजरा करण्यात आला काश्मीरचा भारतातील विलयाचा दिवस !

याचे आयोजन ब्रिटनमधील ‘जम्मू-काश्मीर प्रवासी संघा’ने केला होते. खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले होते.