ब्रिटनच्या संसदेत साजरा करण्यात आला काश्मीरचा भारतातील विलयाचा दिवस !

लंडन (ब्रिटन) – काश्मीरचे भारतात विलय झाल्याच्या घटनेला ७६ वर्षे झाल्याच्या प्रीत्यर्थ ब्रिटनच्या संसदेत (‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये) २६ ऑक्टोबरला ‘जम्मू-काश्मीर दिवस’ साजरा करण्यात आला. याचे आयोजन ब्रिटनमधील ‘जम्मू-काश्मीर प्रवासी संघा’ने केला होते. खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले होते. या वेळी खासदार जोनाथन लॉर्ड, थेरेसा विलियर्स आणि चिपिंग बार्नेट हे सहभागी झाले होते. तसेच काश्मीरच्या राजघराण्यातील अजातशत्रु सिंह आणि रितु सिंह हेही या वेळी उपस्थित होते. तसेच काश्मीरमधील गौतम सेन, सुशील पंडित आणि सज्जाद राजा हे उपस्थित होते. खासदार जोनाथन लॉर्ड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

गौतम सेन यांनी म्हटले की, विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अल्प आहे. यामागे मतपेढीचे राजकारण उत्तरदायी आहे.