तुमच्यावर आक्रमण झाले असते, तर तुम्ही आमच्यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते ! – इस्रायल

हमासचा निषेध करणार्‍या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !

नागपूर येथे अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश मिळवावा ! – मुजीब पठाण, प्रदेश काँग्रेस महासचिव

काँग्रेसने इतकी वर्षे भारतावर राज्य करूनही तिने भारताला अमली पदार्थांच्या विळख्यातून का सोडवले नाही ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे !

अयोध्येतील मशिदीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी ! – इंडियन मुस्लिम लीगची विनंती

मशिदीची पायाभरणी एखाद्या हिंदुकडून करण्याचे अन्य मुसलमान संघटनांंना मान्य आहे का ?

२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आदींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.

नवी मुंबईत नवरात्रोत्सव मंडळाच्या दानपेटीतून ४ सहस्र रुपयांची चोरी !

चोरट्यांना पोलिसांचे जराही भय उरले नसल्याचे सिद्ध करणारी घटना !

मुसलमान महापंचायतीला अनुमती दिली, तर धार्मिक सौहार्द बिघडू शकतो ! – देहली उच्च न्यायालय

देहली न्यायालयाला जे वाटते, ते शांतताप्रिय नागरिकांना नक्कीच वाटत असणार !

लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. येथील ख्रिस्तींची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला  तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

२७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात २ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची काहींची मागणी, तर काहींचा विरोध !

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने तिची नवी पुस्तके बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे गट बनवले आहेत. यावर देशातील राज्यांनी भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची सूचना करतांना काही उदाहरणे दिली आहेत.

अमेरिकेत झालेल्या गोळीबारात २२ जण ठार !

अमेरिकेच्या लेविस्टन येथे २५ ऑक्टोबरच्या रात्री एका उपाहारगृहात करण्यात आलेल्या गोळीबारात २२ जण ठार झाले, तर ६० जण घायाळ झाले. घायाळांपैकी काही जणांनी प्रकृती चिंताजनक आहे.