२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

पंतप्रधान मोदी उपस्थित रहाणार !

नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देताना श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अधिकारी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आदींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. २२ जानेवारी २०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजता अभिषेक होणार आहे. प्राणप्रतिष्ठापणेच्या उत्सवाचा कार्यक्रम १० दिवस चालणार आहे. मंदिर बांधल्यानंतर प्रतिदिन एक ते दीड लाख भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेतील. प्रत्येक भक्ताला गर्भगृहात २० ते ३० सेकंद देवाचे दर्शन घेता येईल.

सौजन्य झी न्यूज इंग्लिश 

ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होणे, हे माझे भाग्य ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी या आमंत्रणावरून इंस्टाग्रामवर लिहिले ‘‘जय सियाराम ! आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. आताच श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्रींच्या अभिषेकप्रसंगी अयोध्येला बोलावले आहे. श्रीराममंदिर. मला फार धन्य वाटत आहे. माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होणार, हे माझे भाग्य आहे.’’