Lakshmi : लक्ष्मी चंचल नाही !
लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो.
लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो.
आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यू येऊ नये; म्हणून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे.
दीपावलीचा सण म्हणजे वेगवेगळ्या उत्सवांचे जणू स्नेहसंमेलनच. दीपावली हा प्रकाशाचा उत्सव !
आश्विन कृष्ण चतुर्दशीला येते, ती ‘नरक चतुर्दशी’ ! या दिवशी पहाटे सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने देव आणि प्रजा यांना त्रास देणार्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला.
आश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. लक्ष्मीची-धनाची पूजा करण्याचा हा दिवस. आपल्या संस्कृतीत धनसंपत्तीला लक्ष्मी समजून तिला पूजनीय मानले आहे.
आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.