अयोध्येतील मशिदीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी ! – इंडियन मुस्लिम लीगची विनंती

नवी देहली – श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला अयोध्येत मशीद उभारण्यासाठी ५ एकर जागा देण्याचा आदेश दिला होता. या जागेवर बांधण्यात येणार्‍या मशिदीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी, अशी विनंती इंडियन मुस्लिम लीगकडून करण्यात आली. येथील श्रीराममंदिरातील भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत होणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. त्या वेळीच मशिदीची पायाभरणी मोदी यांनी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

श्रीरामजन्मभूमीच्या खटल्यातील मुसलमान पक्षाचे याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन’च्या सदस्यांना मशिदीच्या बांधकामातील विलंबासाठी उत्तरदायी ठरवले आहे. ‘विश्‍वस्त चांगले असते, तर आतापर्यंत काही कामे झाली असती. मशिदीच्या बांधकामात सरकारने सहकार्य करावे आणि विश्‍वस्तही पालटावेत’, असे ते म्हणाले.

संपादकीय भूमिका 

मशिदीची पायाभरणी एखाद्या हिंदुकडून करण्याचे अन्य मुसलमान संघटनांंना मान्य आहे का ?