देहली उच्च न्यायालयाने देहलीतील रामलीला मैदानात ‘मुसलमान महापंचायती’चे आयोजन करण्याची अनुमती नाकारली !
नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने येथील रामलीला मैदानात मुसलमान महापंचायतीला अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या सणांच्या कालावधीनंतर आयोजक पुन्हा एकदा संबंधित प्रशासनाकडे अनुमतीसाठी अर्ज करू शकतात. जर महापंचायतीला अनुमती दिली, तर धार्मिक सौहार्द बिघडू शकतो. या महापंचायतीचे भित्तीपत्रकाचा रंग धार्मिक आहे. सध्या सणांचा काळ असल्याने मुसलमान महापंचायतीला अनुमती दिली जाऊ शकत नाही.
१. देहली पोलिसांनी प्रथम या महापंचायतीला अनुमती दिली होती; मात्र नंतर ती रहित केली. यावर आयोजकांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून अनुमती देण्याची मागणी केली होती.
२. ‘वी द इंडियन मुस्लिम’ (आम्ही भारतीय मुसलमान) या नावाने या महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार होते. यात सध्या मुसलमनांसमोर उपस्थित होणार्या सूत्रांविषयी चर्चा होणार होती. याविषयी ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’च्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय असेल आणि यात सर्व धर्मांमध्ये शांतता अन् सहकार्य यांसाठी इच्छा व्यक्त केली जाईल. (असे कधीतरी केले जाते का ? मुसलमानांच्या संघटना कधी देशातील जिहादी आतंकवादाचा निषेध करतात का ? – संपादक)
संपादकीय भूमिकादेहली न्यायालयाला जे वाटते, ते शांतताप्रिय नागरिकांना नक्कीच वाटत असणार ! |