अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ‘कॅट’ची केंद्रशासनाकडे तक्रार !

विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्‍याप्रकरणी ‘जनरल कॉन्‍फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्‍येष्‍ठ अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ग्राहक व्‍यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

पिंपरी (पुणे) येथील ‘ग.दि.मा. नाट्यगृहा’त नाटकाचा एकही प्रयोग नाही !

जनतेच्‍या कराचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवण्‍याचा महापालिकेला काय अधिकार आहे ? असे निर्णय घेण्‍याआधी सूचना, हरकती घेतल्‍या होत्‍या का ?

कर्नाटकने म्हादई नदीवरील धरणासाठी काढली निविदा !

कर्नाटक येथील खानापूरस्थित ‘कर्नाटक निरवरी निगम’ या शासकीय आस्थापनाने ही निविदा काढली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्याचा उल्लेख निविदेत करण्यात आला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

यांच्‍या या वक्‍तव्‍यामुळे माझ्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या असल्‍याचे श्री. चितापुरे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

प्राचार्यांना ‘फादर’ म्‍हणायला लावल्‍याप्रकरणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्‍ठान’ने खडसावले !

धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र म्‍हणवल्‍या जाणार्‍या भारतातील शाळेत प्राचार्यांना ‘फादर’ म्‍हणण्‍यास सांगितले जाणे अयोग्‍य ! देशातील अन्‍य शाळा किंवा महाविद्यालये येथे असा प्रकार होत नाही ना ?

मशिदींवरील ध्‍वनीप्रदूषण करणारे भोंगे काढून संबंधितांवर गुन्‍हे नोंद करा !

अनेक वर्षांपासून वेळीअवेळी भल्‍या पहाटे होणार्‍या भोंग्‍यांच्‍या आवाजामुळे परिसरातील लहान मुले, विद्यार्थी, वयस्‍कर, तसेच आजारी आदींना शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सनातन धर्मावर अभद्र टीका करणार्‍यांवर खटले चालवा ! – जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु योद्धा परिवार’ संघटनेची मागणी

आगामी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे वैशिष्ट्य !

‘जगातील सर्वच महाविद्यालयांत आणि विश्वविद्यालयांत मायेतील विषयांचे शिक्षण दिले जाते. याउलट ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात’ १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमांतून ‘मायेतून मुक्ती कशी मिळवायची’, याचे शिक्षण देण्यात येणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तर्पण आणि पितृतर्पण यांचा उद्देश अन् महत्त्व !

कोणत्‍याही श्राद्धविधीमध्‍ये ‘तर्पण’ दिले जाते. ‘तर्पण’ म्‍हणजे काय ? त्‍याचे महत्त्व आणि प्रकार, त्‍याचा उद्देश, तसेच ते करण्‍याची पद्धत यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.