सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ यशपाल चितापुरे यांची फौजदार चावडी येथे तक्रार
सोलापूर, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. यशपाल चितापुरे यांनी फौजदार चावडी येथे प्रविष्ट केली आहे. सनातन धर्माची ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’, ‘कोरोना’, ‘एड्स’ आणि ‘कुष्ठरोग’ आदी रोगांशी तुलना करून सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे श्री. चितापुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.