जालन्‍यातील आंदोलनामुळे एस्.टी. महामंडळाचे ४६ आगार पूर्णत: बंद !

८ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न आणि २ कोटी ६० लाख रुपये महसूल बुडाला

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनामुळे गेल्‍या ३ दिवसांत एस्.टी.च्‍या २५० आगारांमधील ४६ आगार पूर्णत: बंद आहेत. प्रामुख्‍याने अहिल्‍यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्‍ह्यांमध्‍ये बंदचा प्रभाव अधिक आहे. मागील ३ दिवसांमध्‍ये आंदोलनकर्त्‍यांकडून एस्.टी. च्‍या २० बसगाड्या जाळण्‍यात आल्‍या, तसेच १९ बसगाड्यांची तोडफोड करण्‍यात आली. यामुळे अनुमाने ५ कोटी २५ लाख रुपयांची हानी झाली आहे, तर बंद असलेल्‍या आगारांमुळे अन् आगारातील अंशतः रहित केलेल्‍या फेर्‍यांमुळे एस्.टी. महामंडळाच्‍या तिकीट उत्‍पन्‍नातील ८ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न बुडाले आहे. एस्.टी. बसगाड्यांच्‍या एकूण फेर्‍यांतील अनुमाने ६ सहस्र २०० फेर्‍या रहित करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे २ कोटी ६० लाख रुपयांचा महसूलही बुडाला आहे.

आंदोलनाच्‍या वेळी सर्वसामान्‍यांची प्रवासात होणारी आणि अन्‍य गैरसोय टाळण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना काढाव्‍यात !