पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

पुणे – येथील कोंढवा परिसरातील ‘टीम्‍स तकवा इस्‍लामिक मतलब अँड स्‍कूल’ ही शाळा अनधिकृतरित्‍या चालवली जात असल्‍याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्‍त झाली होती. या शाळेच्‍या संस्‍थाचालकांनी शिक्षण उपसंचालक यांची अनुमती न घेता, जिल्‍हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांची मान्‍यता न घेता शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू केले होते. या प्रकरणी पुणे महापालिकेच्‍या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली. यावरून शाळेचे संस्‍थाचालक उस्‍मान आत्तार, सचिव फिरोज खान यांच्‍यासह मुख्‍याध्‍यापक आणि इतरांवर पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

ऑगस्‍ट २०२२ पासून चालू असलेल्‍या शाळेत एकूण १५८ विद्यार्थ्‍यांना प्रवेश देण्‍यात आले होते. या शाळेला मान्‍यता नसल्‍यामुळे ‘यू-डायस’ क्रमांक नव्‍हता. शाळेचा समावेश शासनाच्‍या ‘सरल पोर्टल’वर नसल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना ‘सरल आयडी’ नव्‍हता. त्‍यामुळे या शाळेत शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश मिळण्‍यास अडचण निर्माण होत होती, तसेच विद्यार्थ्‍यांना शाळेकडून दिलेले शाळा सोडल्‍याचे दाखले आणि इतर दाखले वैध अन् नियमानुसार नव्‍हते. याविषयीची तक्रार प्राप्‍त होताच शिक्षण विभागाच्‍या अधिकार्‍यांनी धाड घालून हे प्रकरण उघड केले.

संपादकीय भूमिका

  • १५८ विद्यार्थ्‍यांना अवैधरित्‍या प्रवेश दिला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ?

  • अशांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे !

  • यामुळे मुलांची झालेली हानी आणि त्‍यातून झालेल्‍या मनस्‍तापाचे दायित्‍व कुणाचे ?