हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा नागपूर येथील युवकांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पारडी भागातील गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव याविषयी समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी मार्गदर्शन केले.

दुष्काळ स्थिती भोगणार्‍या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

ही पंचांगांची गणित पद्धत भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाची तफावत येत असते. ‘अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण-उत्सवाविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे

नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आडकाठी आणू नये ! : Ganesh Visarjan

नैसर्गिक जलक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या विसर्जनास आडकाठी न आणण्याच्या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.

हिंदी भाषा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला एका सूत्रात बांधते ! – गृहमंत्री अमित शहा

पुणे येथे तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी भाषा एका सूत्रात बांधते’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

(म्हणे) ‘प्रक्षोभक भाषण करणार्‍या विक्रम पावसकर यांना अटक करा !’

या हिंसाचारात विक्रम पावसकर यांचा हात आहे, असे जर पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी जाहीर केले आहे, तर पुन्हा सर्वसमावेशक सत्यशोधन समिती कशासाठी नेमायची आहे ? अशी चौकशी समिती नेमून पावसकर यांच्यासमवेत आणखी ४ हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा विचार आहे का ?

यात आश्चर्य ते काय !

‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले