हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा नागपूर येथील युवकांचा निर्धार !

नागपूर, १६ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पारडी भागातील गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव याविषयी समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार कृती करण्याची सिद्धताही  सगळ्यांनी दर्शवली. बैठकीच्या आयोजनासाठी समाजसेवक श्री. वैद्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जागृती करणे, त्यासाठी साहाय्य करणे ही मोहीम समितीच्या वतीने चालू आहे.

विशेष

१. मंडळाचे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन झालेले असतांनाही ‘विषय महत्त्वाचा आणि आवश्यक वाटल्याने पूर्वनियोजनात काही पालट करून समितीने सांगितल्यानुसार काही कार्यक्रम नक्कीच घेऊ’, असे मंडळ सदस्यांनी सांगितले.
२. व्याख्यान, क्रांतिकारकांच्या जीवनावरील आधारित फ्लेक्स प्रदर्शन, धर्मशास्त्रानुसार श्री गणेश उपासनेची माहिती देणारे भित्तीपत्रक लावून समितीच्या कार्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
३. बैठकीला विशेषतः तरुण वर्ग उपस्थित होता. सगळ्यांनीच गांभीर्याने विषय समजून घेतला आणि ‘ही काळाची आवश्यकता आहे. आम्ही हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करणार’, असे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.