विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे
वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?
वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?
या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल.
अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसर्या मजल्यावरील एका खोलीचा सज्जा २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळला.
गोवा राज्यातील मद्य छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या तिघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवला.
जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणार्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून ‘वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश’ अशी ओळख निर्माण झाली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची स्थापना वर्ष १९९६ मध्ये झाली; मात्र उपक्रमाला २३ वर्षे होऊनही येथे कार्यरत असलेल्या कायम तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्यांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली नव्हती.
लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला १०० ‘इ-बस’ देणार आहे, अशी माहिती सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
शाळा-महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे आवाहन करणारे श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन !
‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.