नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !
कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गल्लीबोळातील कचर्यावरून महापालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेसमवेतच अनधिकृत फलक हटवण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे महापालिकेने ठरवले आहे.
भांडुप येथील भट्टीपाडा चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ६४ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने हटवली आहेत. ४० वर्षे जुनी बांधकामे हटवल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ?
सध्या म्हादईपासून खोतीगावपर्यंतचा पट्टा व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. उरलेला जो भाग म्हणजे बफर झोन आहे, तिथे लोक शेती आणि बागायती करू शकतात, अशी आश्वासक माहिती पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिली आहे.
कॅसिनो म्हणजेच जुगार याला महसूल प्राप्तीसाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अध:पतन हे ठरलेलेच आहे. गोव्यात कॅसिनोला दिलेल्या अधिमान्यतेचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.
फातर्पा येथील शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतांनाच क्रीडा खात्याकडून त्याला १ सप्टेंबर या दिवशी त्याच्या निलंबनाचा आदेश देण्याचा निराळा प्रकार घडला आहे.