नाशिकचे प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण !

हेमंत पारख

नाशिक – इंदिरानगर येथे २ सप्टेंबरच्या रात्री ९.४५ वाजता येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गुंडांनी त्यांच्या घरासमोरून अपहरण केले आहे. हे गुंड चारचाकीतून आणि दुचाकीवरून आले होते. त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत ढकलले आणि सुसाट वेगाने पळून गेले. अपहरणामागील कारण समजलेले नाही.

हेमंत पारख हे ‘गजरा ग्रुप’चे अध्यक्ष आहेत. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. पोलिसांना अजून त्यांचा शोध लागलेला नाही. परिसरातील ‘सीसीटीव्ही’चे चित्रण पहाण्याचे काम चालू आहे. अनेक जणांचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच प्रत्येक वाहनाची कसून पडताळणी केली जात आहे.