स्थानिक पोलीस आणि आतंकवादविराेधी पथक यांनी केली चौकशी !

कणकवली – सामाजिक माध्यमाद्वारे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासह हिंदु देवतेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील अल्पसंख्य समाजातील एका युवतीवर गुन्हा नोंद केला आहे.
या युवतीची एक मैत्रिण पाकिस्तानमध्ये रहाते. १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असल्याने या युवतीने तिच्या मैत्रिणीला ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावर शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच हिंदूंच्या एका देवतेची अपकीर्ती केली होती. याविषयी समजल्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी येथील पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित युवतीवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार स्थानिक पोलीस आणि आतंकवादविरोधी पथक यांनी ही युवती आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. या वेळी युवतीने पाठवलेल्या संदेशाची खात्री करून पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारा संदेश प्रसारित करणे आणि हिंदु देवतांची अपकीर्ती करून धार्मिक भावना दुखावणे अन् सामाजिक तेढ निर्माण करणे, या प्रकरणी युवतीवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Anurag Dhankar Found Dead : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड हे पोलीस मुख्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin