अभिनेते किरण माने यांचे हिंदूंना उद्देशून विधान

मुंबई – अभिनेते किरण माने यांनी ‘हॉलिवूड’च्या (इंग्रजी चित्रपटसृष्टीच्या) ‘द डार्क नाईट’ या चित्रपटातील ‘जोकर’ नावाचा खलनायक आणि हॉलिवूडमधीलच नायक ‘बॅटमॅन’ यांच्या संभाषणामध्ये मराठी वाक्य घालून ते स्वत:च्या फेसबूकवरून प्रसारित केले आहे. माने यांनी प्रसारित केलेल्या वाक्यात ‘जोकर’ ‘बॅटमॅन’ला म्हणतो, ‘पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घे. भारतात मुसलमान आहेत; म्हणून तुम्ही हिंदू आहात. नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे रहाणार.’ या वाक्यातून भारतातील हिंदूंचे अस्तित्व मुसलमानांवर अवलंबून असल्याचे माने यांनी दर्शवले आहे.
‘भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही…’; किरण मानेंचा सूचक इशारा#kiranmane #entertainmentnews #entertainmenthttps://t.co/fMMRmSxmao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 3, 2023
(बहुसंख्य हिंदूंनी अल्पसंख्यांक मुसलमानांना आश्रय दिला. स्वत:पेक्षा अधिक सवलती दिल्या. एकीकडे पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती विदारक आहे, तर दुसरीकडे भारतातील धर्मांध मुसलमान उद्दाम बनले आहेत. याकडे असे अभिनेते कानाडोळा का करतात ? – संपादक)
संपादकीय भूमिकाछत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा अभिमान नसलेले धर्माभिमानशून्यच असे वक्तव्य करू शकतात ! |
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
संपादकीय : हिंदू जात्यात !
धर्मशास्त्र काय सांगते ?