
नवी मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीमार करून उलट त्यांच्यावरच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील हे गुन्हे मागे घेऊन पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘मराठा उद्योजक लॉबी’चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वैभव फडतरे यांनी वाशी येथे दिली आहे.
जालना येथे मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नवी मुंबई मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !