कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात नुकतेच नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या बाहेर औदुंबराचे झाड असून त्याच्या बाहेर संरक्षक भिंत आहे. ‘औदुंबरामध्ये श्री दत्ततत्त्व असते. त्यामुळे भाविकांकडून हे झाड स्थलांतरित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येत आहे. स्वच्छतागृहाच्या बाहेरच हे झाड असल्याने स्वच्छतागृहातील पाणीही या झाडाकडे जाण्याची शक्यता आहे. ‘ही गोष्ट धार्मिक दृष्टीने अयोग्य असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने तात्काळ लक्ष घालावे’, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. स्वच्छतागृह बांधतांना ही गोष्ट प्रशासनाच्या का लक्षात आली नाही ? अशीही विचारणा भाविकांकडून होत आहे.