श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध

‘काली माँ : अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज’ पुस्तकाचे आक्षेपार्ह मुखपृष्ठ

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नवी देहली – ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने आतापर्यंत अनेकदा हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. याला प्रत्येक वेळी हिंदूंनी विरोध केल्यानंतर अ‍ॅमेझॉनने त्या विक्रीतून हटवल्या; मात्र तिच्याकडून पुनःपुन्हा अशा वस्तूंची विक्री करणे चालूच आहे. आता श्री महाकालीमातेचा अवमान करण्यात येत आहे. अ‍ॅमेझॉनने ‘काली माँ : अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज’ (काली माता : लघुकथांचा संग्रह) नावाचे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक ईएल्.टी. फुलाह असून ते मुळचे अमेरिकेतील आहेत. ‘हे पुस्तक भारतात विक्रीस उपलब्ध नसले, तरी पुढे ते भारतातही विकले जाऊ शकते’, असे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. या पुस्तकाच्या विक्रीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आता विरोध होऊ लागला आहे. सामाजिक माध्यमांतून या पुस्तकाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

  • अ‍ॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
  • असा प्रकार अ‍ॅमेझॉनने अन्य धर्मियांच्या संदर्भात केला असता, तर काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको !