गोव्यातील आमदार आता लेह-लडाखच्या अभ्यास दौर्‍यावर जाणार

पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील मंत्री आणि आमदार केंद्रशासित प्रदेश लेह-लडाख येथे अभ्यास दौर्‍यासाठी जाणार आहेत. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी ५ दिवसांच्या या दौर्‍यासाठी इच्छुक आमदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ६ ते १० सप्टेंबर या कालावधीत हा दौरा होणार आहे आणि यासाठी इच्छुकांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी राज्यातील ९ आमदार १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत गुजरातच्या अभ्यास दौर्‍यावर गेले होते. त्यानंतर आमदारांचा हा दुसरा दौरा आहे. (आमदार अभ्यास दौर्‍यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय ! – संपादक)