देहलीत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !

अ‍ॅमेझॉन आस्थापनाचे वरिष्ठ व्यवस्थापक हरप्रीत गिल

नवी देहली – देहलीच्या भजनपुरा भागात २९ ऑगस्टच्या मध्यरात्री अ‍ॅमेझॉन आस्थापनाचे वरिष्ठ व्यवस्थापक हरप्रीत गिल (वय ३६ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्या करणारे दुचाकी वाहनांवरून आले होते. या वेळी गिल हे गोविंद सिंह यांच्यासमवेत दुचाकी वाहनावरून जात असतांना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात गिल यांच्या डोक्याला गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोविंद सिंह यांनाही गोळी लागल्याने ते घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलीस हत्या करणार्‍यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !